ताज्या घडामोडीपुणे

कॅम्पातील विक्रेत्यांकडे खंडणी मागणारे सराईत गुंड जेरबंद

पुणे | कॅम्प परिसरातील एमजी रस्त्यावर कपडे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना घातक शस्त्रांचा धाक दाखवून खंडणी मागणाऱ्या आणि जबरदस्तीने त्यांच्याजवळ रोख रक्कम लुबाडून येणाऱ्या तिघांना पोलिसांनी जेरबंद केले. लष्कर पोलिसांनी ही कारवाई केली. शानू शफिक शेख (वय 19), अर्षद आयुब पठाण (वय 25) आणि रिहान नजीर अहमद शेख (वय 25) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी त्या परिसरात फुटपाथवर कपडे विक्री करत असताना आरोपी त्या ठिकाणी आले. या ठिकाणी व्यवसाय करायचा असेल तर हप्ता द्यावा लागेल असे सांगितले. परंतु फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिला असता त्याला मारहाण करून पालघनचा धाक दाखवून त्याच्या खिशातील साडेतीन हजार रुपये जबरदस्तीने चोरून नेले. याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.

दरम्यान लष्कर पोलीस ठाण्यातील काही कर्मचारी या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत होते. या गुन्ह्यातील आरोपी बिशप स्कूल शेजारील पडीक बंगल्याजवळ थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलीस या ठिकाणी गेले असता पोलिसांना पाहून आरोपींनी पळ काढला. परंतु पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button