breaking-newsताज्या घडामोडीपुणे

#HBDशरद पवार: वाढदिवसानिमित्त राज्यात ‘व्हर्च्युअल रॅली’चे आयोजन – जयंत पाटील

पुणे – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा ८० वा वाढदिवस एका अनोख्या व वेगळया पध्दतीने साजरा करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने निर्णय घेतला असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्रातील ३६ जिल्हयातील ३५० पेक्षा जास्त तालुक्यामध्ये हा कार्यक्रम व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून दाखवला जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पुणे येथे आज (९ डिसेंबर) पत्रकार परिषदेत दिली.

वाचा :-पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळासाठी राजनाथ सिंग-शरद पवार यांची भेट

महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून जवळपास सात ठिकाणाहून राष्ट्रवादीचे विविध नेते त्यात सहभागी होणार आहेत. सर्वात प्रमुख कार्यक्रम हा मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे अगदी मोजक्याच लोकांमध्ये व हॉलची मर्यादा लक्षात घेऊन केला जाणार आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्रभरातील जनतेला पाहता येणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने एक नवीन वेबसाईट आधुनिक पध्दतीने तयार केली आहे. या वेबसाईटचे उद्घाटन होणार आहे. यावेळी अॉनलाईन मेंबरशीप ड्राईव्ह सुरू करणार असून डिजिटल टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसची डिजिटल पावती फाडतील आणि या उपक्रमाची सुरुवात राज्यात सुरू होईल.

कोरोना काळात अनेक समाजांना फार मोठा फटका बसला आहे. त्यामध्ये आदिवासी समाजातील लोकांना सर्वाधिक बसला आहे. त्यामुळे राज्यातील आदिवासी भागात एकाचवेळी सुमारे एक लाख मेडिकल किट्स वाटप केली जाणार असून शरद पवार यांच्या हस्ते प्राथमिक स्वरूपात विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना ते दिले जाणार आहे.

वाचा :-काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पंतप्रधान मोदींनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

७ दिवसात विक्रमी रक्तदान करून रक्ताचा तुटवडा भरून काढणार !
राज्यात रक्ताचा तुटवडा भासत असून शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीच्या पुढाकाराने दिनांक १३ ते २० डिसेंबरपर्यंत रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. ७ दिवसात विक्रमी रक्तदान करून रक्ताचा निर्माण झालेला तुटवडा भरून काढला जाणार आहे.

डिजिटल रॅलीत अडीच ते तीन लाख लोक सहभागी होतील !
राज्यात राष्ट्रवादीच्यावतीने पहिल्यांदाच डिजिटल रॅलीची संकल्पना राबवली जात आहे. या माध्यमातून ४०० – ५०० ठिकाणी या डिजिटल रॅलीत अडीच ते तीन लाख लोक सहभागी होतील असे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाचे भान ठेवून शरद पवार यांना भेटण्यासाठी कुणीही आमदार, खासदार, पदाधिकारी येणार नसून ज्या ज्या ठिकाणी डिजिटल रॅली आयोजित करण्यात आली आहे. त्या त्या ठिकाणी थांबण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button