भारती विद्यापीठाच्या एरंडवणे कॅम्पसमधील रक्तदान शिबिरास चांगला प्रतिसाद
![Good response to Blood Donation Camp at Erandwane Campus of Bharti University](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/Bhaati-Vidhyapeeth-1-780x470.jpg)
- ‘आयएमईडी’तर्फे यशस्वी आयोजन
पुणे : भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट(आयएमईडी) तर्फे एरंडवणे कॅम्पसमध्ये आयोजित रक्तदान शिबिरास गुरुवारी चांगला प्रतिसाद मिळाला.भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ.पतंगराव कदम यांची जयंती आणि कार्यवाह डॉ.विश्वजित कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून १२ जानेवारी रोजी सकाळपासून हे शिबीर आयोजित करण्यात आले होते.भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ.विवेक सावजी यांच्याहस्ते उदघाटन झाले. भारती विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता आणि आयएमईडीचे संचालक डॉ.सचिन वेर्णेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर पार पडले.
डॉ.उज्ज्वला बेंडाळे,डॉ.आत्माराम पवार यांच्यासह प्राचार्य वर्ग,मुख्याध्यापक वर्ग,पदाधिकारी,राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी,सेवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.भारती विद्यापीठ एरंडवणे कॅम्पसमधील विविध अभ्यासक्रमाचे विद्यार्थी,प्राध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी रक्तदान शिबिरात सहभागी झाले.दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला. याव्यतिरिक्त आयएमईडी तर्फे आयोजित डॉ.पतंगराव कदम राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धा ,आंतर महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धा हे उपक्रम देखील उत्साहात पार पडले.