Good News; पुण्यात आज कोरोना रुग्ण संख्या हजार पेक्षा कमी
![In Ratnagiri, three children beat Delta Plus variant of Corona](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/corona-122-3.jpg)
पुणे |महाईन्यूज|
पुण्यात कोरोना बाधित रुग्ण संख्या आटोक्यात येवू लागली आहे. आज (गुरुवारी) एकुण 930 रुग्णसंख्या आढळली आहे. त्यामुळे पुणेकरांसाठी ही निश्चित आनंदाची बाब आहे. चाचण्यांचे प्रमाण कायम असताना एकुण रुग्णसंख्या कमी होवू लागल्याने मोठा दिलासा मानला जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली होती. शहरात जवळपास पाच हजाराच्या घरात ही रुग्णसंख्या गेली होती. मात्र गेल्या काही आठवड्यात लॉकडाऊन लागला त्यानंतर ही संख्या हळू हळू कमी व्हायला सुरुवात झाली.
याच आठवड्यात सोमवारी एकुण कोरोना रुग्णांची संख्या सातशेचा आसपास आली होती. पण चाचण्यांची संख्या कमी असल्याने सोमवारी तुलनेत एकुण रुग्ण संख्या कमीच येते. आज मात्र चाचण्यांचे प्रमाण कायम राहून देखील ९३० नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. हजाराच्या खाली रुग्ण संख्या येणे हा मोठा दिलासा मानला जात आहे.
अर्थात रुग्ण संख्या आटोक्यात येत असली तरी गंभीर रुग्णांची आणि मृत्यू ची संख्या कमी होत नाहीये. हे एक काळजीचे कारण मानले जात आहे. उद्या शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार हे या कोरोना परिस्थितीचा आढावा घेत आहेत. कमी झालेल्या रुग्ण संख्येचा पार्श्वभूमीवर आता पुणे शहराला लॉकडाऊनचा नियमात काही दिलासा मिळतोय का हे पहावा लागेल.