माजी बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे निधन
![Former badminton player Nandu Natekar passes away](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/n-2.jpg)
पुणे – माजी बॅडमिंटनपटू अर्जुन पुरस्कार विजेते नंदू नाटेकर यांचे पुण्यात निधन झाले आहे. ते ८८ वर्षाचे होते. नंदू नाटेकर हे जागतिक स्तरावर उत्तम कामगिरी बजाविणारे पहिले भारतीय बॅडमिंटनपटू होते.त्यांनी १०० हून अधिक स्पर्धा जिंकल्या आहेत. तसेच ते पहिल्या अर्जुन पुरस्काराचे ते मानकरी होते. मलेशियाने प्रसिद्ध केलेल्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंच्या यादीत त्यांना स्थान देण्यात आले होते.
बडमिंटनच्या एकेरी, दुहेरी आणि मिश्र या तिन्ही प्रकारांमध्ये त्यांनी राष्ट्रीय स्पर्धेचे तब्बल १७ वेळा विजेतेपद मिळविले. याशिवाय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक विजेतेपदे त्यांनी जिंकली होती. त्यांची ही कामगिरी अतुलनीय आहे.त्यांच्या निधनामुळे भारतीय क्रीडाविश्वातील एक उज्ज्वल पर्व काळाच्या पडद्याआड गेले, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी नंदू नाटेकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
माजी बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे निधन झाले.जागतिक स्तरावर उत्तम कामगिरी बजाविणारे ते पहिले भारतीय बॅडमिंटनपटू होते.याखेरीज पहिल्या अर्जुन पुरस्काराचे ते मानकरी होते.मलेशियाने प्रसिद्ध केलेल्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंच्या यादीत त्यांना स्थान देण्यात आले होते. pic.twitter.com/da3xrca7LZ
— Supriya Sule (@supriya_sule) July 28, 2021