एमआयटी महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी
पुणे | पुण्यातील लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एमआयटी महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दहा ते अकरा जणांच्या टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 10 डिसेंबर रोजी हा प्रकार घडला.दुर्वेश राजेश नाईक (वय 19) या विद्यार्थ्यांने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार स्वराजे शर्मा, आयुष पांडे, रोहन चौबे, प्रसल अधिकारी, गर्व सबरवाल, सनी संकल्प आणि पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणी काळभोर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. आठ डिसेंबर रोजी कॉलेजमध्ये झालेल्या पार्टीत झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादी आणि त्याच्या मित्रांना हातातील लोखंडी कड्याने व माती विटांनी मारहाण करून जखमी केले आहे. लोणी काळभोर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.