शिवनेरीवर किल्ल्यावर शिवजन्म सोहळा उत्साहात
![Excitement of Shivjanma ceremony at Shivneri fort](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/shivneri.jpg)
पुणे | प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर जन्मसोहळा साजरा झाला. गेल्या काही वर्षांपासून शिवनेरीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पाळणा जोजवला जातो. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी उपस्थित राहू शकले नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे शिवनेरी किल्ल्यावर शिव जन्मसोहळ्याला उपस्थित होते. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हेसुद्धा शिवजन्म सोहळ्यासाठी शिवनेरीवर आले होते.
आज शिवजयंती साजरी करत असताना आपण आत्मचिंतन करण्याची गरज आहे, त्यांचे विचार कसे आत्मसात करू शकतो, शिवरायांच्या स्वराज्यातून आपण काय घ्यायला हवं हे पाहण्याची आज गरज आहे असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले. शिवनेरीवर येण्यापासून लोकांना थांबावं लागत आहे. केवळ निमंत्रितांनाच या सोहळ्याला उपस्थित राहण्यास परवानगी असते. त्याबाबत संभाजीराजेंना विचारले असता ते म्हणाले की, इथली इतर परिस्थिती आणि याआधी एकदा हेलिकॉप्टरवर दगडफेकीची घटना झाली होती त्यामुळे काही बंधने आहेत.