TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमुंबई

नको हार बुके , भेट द्या शैक्षणिक साहित्य, वह्या पुस्तके…! : आमदार राहुल कुल

दौंड : वाढदिवसानिमित्त कोणताही अनावश्यक खर्च न करता किंवा हार-तुरे आणि बुके न भेट देता. शैक्षणिक साहित्य भेट द्या, असे आवाहन भाजपा आमदार ॲड. राहुल कुल यांनी केले आहे.
दौंड तालुक्याचे आमदार ॲड. राहुल कुल यांचा वाढदिवस दि ३० ऑक्टोबर रोजी साजरा होत आहे. यानिमित्त जिल्ह्यातून त्यांचे समर्थक, हितचिंतक आणि कार्यकर्ते येणार आहेत. यावेळी भेटीसाठी येताना केक, शाल, हार, बुके घेऊन न येता शालोपयोगी शैक्षणिक साहित्य, वह्या पुस्तके भेट द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, जमा होणाऱ्या सर्व शैक्षणिक साहित्याचे वाटप आमदार ॲड. राहुलदादा कुल यांच्या हस्ते गोर गरीब, होतकरू तसेच कोरोना महामारीत अनाथ झालेल्या विद्यार्थांना करण्यात येणार आहे. आमदार कुल यांच्या उपक्रमाचे सर्वसामान्य नागरिकांमधून स्वागत होत आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button