ताज्या घडामोडीपुणे

ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात एक मोठी दुर्घटना टळली

अचानक घरगुती सिलेंडरला आग, परिसरात एकच खळबळ माजली

पुणे : ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज सकाळी सासवडपासून पुढे जेजुरीकडे निघाला आहे. यादरम्यान दिंडी क्रमांक ७८ मधील स्वयंपाक सुरू असताना घरगुती सिलेंडरला अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरामध्ये एकच धावपळ उडाली होती. मात्र, वारकरी आणि अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सासवडकडून जेजुरीकडे रवाना झाली आहे. या दरम्यान सकाळी साधारण दहाच्या सुमारास दिंडी क्रमांक ७८ मध्ये स्वयंपाक सुरू असताना घरगुती सिलेंडरने अचानक पेट घेतला. स्फ़ोटाच्या आवाजाने एकच खळबळ उडाली. सिलेंडरने पेट घेतल्याने आग लागण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, वारकऱ्यांनी सिलेंडरवर माती टाकून आग विजवण्याचा प्रयत्न केला.

जर मोठा स्फोट झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असती

त्यानंतर सोबत असलेल्या अग्निशामक दलाच्या जवानांना याबाबतची माहिती देण्यात आली. जवानांनी घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली. सिलेंडरचा मोठा स्फोट झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. वारकरी आणि अग्निशामक दलाच्या जवानांमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. जेजुरी रस्त्यावरील वाळुंज फाटा येथे हा प्रकार घडला आहे.

पुणे अग्निशमन दलाचे वाहन गेली कित्येक वर्ष आळंदी ते पंढरपूर माऊलींच्या सुरक्षतेकरिता तसेच आग व आपत्कालिन परिस्थितीत तातडीने मदत मिळावी म्हणून अग्निशमन अधिकारी व जवान तैनात असतात. इतर महानगरपालिका, पीएमआरडीए व नगरपालिका व इतर अग्निशमन वाहनेदेखील बंदोबस्ताकरिता असतात. आज घडलेल्या घटनेमुळे पुणे अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग आटोक्यात आणल्याने उपस्थित वारकरी समुदाय यांनी जवानांचे आभार मानले आहेत. पुणे अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांनीही अधिकारी व जवानांचे कौतुक केले आहे.
सोपान काकांच्या पालखीचं प्रस्थान, आमदार संजय जगतापांनी धरला फुगडीचा फेर

या कामगिरीत अग्निशमन अधिकारी प्रमोद सोनावणे, वाहनचालक नारायण जगताप, तांडेल विलास दडस, फायरमन श्री बाबासाहेब चव्हाण, चंद्रकांत नवले व अटेंडंड युवराज गवारी यांनी सहभाग घेतला होता.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button