Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना; रोहित पवार आक्रमक; म्हणाले, “गांधींच्या विचारांवर अघात…”l

पुणे : पुण्यातील रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर रविवारी रात्री सुरज शुक्ला नामक व्यक्तीने भगवे वस्त्र परिधान करून पुतळ्यावर कोयत्याने वार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना केल्या प्रकरणी सुरज शुक्ला याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सांगण्यात आली आहे.

महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाकडून आंदोलन करण्यात आलं आहे. तसेच काँग्रेस पक्षाकडून महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला दुग्धभिषेक घालण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही प्रतिक्रिया देत निषेध व्यक्त केला आहे. तसेच कोणी कितीही डोक आपटलं, कितीही चुकीच्या गोष्टी केल्या तरी महात्मा गांधी यांचा विचार संपणार नसल्याचं रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

हेही वाचा –  कोल्हापूरात ३६ वर्ष सोबत राहिलेल्या नेत्याने दिला तडकाफडकी राजीनामा

“नथुराम गोडसे हे गेले, पण त्यांच्या विचारांचे वारसदार आजही राहिलेले आहेत. अनेकवेळा महात्मा गांधी यांच्या विचारांवर अघात झाला. कितीही वेळा त्यांचा विचार तोडण्याचा आणि संपवण्याचा प्रयत्न झाला. मात्र, तरीही महात्मा गांधी यांचा विचार संपला नाही आणि संपणारही नाही. त्यामुळे गोडसे यांच्या विचारांचे जे कोणी लोक असतील त्यांनी कितीही डोक आपटलं, कितीही चुकीच्या गोष्टी केल्या तरी महात्मा गांधी यांचा विचार या भूमितून संपणार नाही”, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

पुणे शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर रविवारी रात्री सुरज शुक्ला या व्यक्तीने भगवे वस्त्र परिधान करत पुतळ्यावर कोयत्याने वार करत पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी पोलिसांनी सुरज शुक्लाला ताब्यात घेत कारवाई केली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button