Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वडिलोपार्जित जमिनीच्या पोटहिश्शांची मोजणी केवळ 200 रुपयात, सरकाराचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा

Chandrashekhar Bawankule : वडिलोपार्जित जमिनीच्या पोटहिश्शांची मोजणी आता माफक दरात होणार आहे. शेतकरी कुटुंबात जमिनीच्या पोटहिश्शांबाबत मोजणी करण्यात येते. त्यात वाद असेल तर मग झटपट नोंदणी करावी लागते. या सर्वांसाठी मोठा खर्च येतो. पण आता वडिलोपार्जित जमिनीच्या पोटहिश्शांची मोजणी अत्यंत कमी दरात म्हणजे केवळ प्रति पोटहिस्सा 200 रुपयांत होणार आहे. राज्य सरकारच्या नवीन निर्णयांची माहिती संबंधित जिल्ह्यातील भूमी अभिलेख विभागाला देण्यात आली आहे. या नवीन निर्णयाचा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. जिल्ह्यात पोटहिस्सा मोजणीसाठी जेव्हा अर्ज येईल, तेव्हा त्यासाठी शेतकऱ्यांना केवळ 200 रुपये द्यावे लागतील.

यापूर्वी वडिलोपार्जित पोटहिस्सा मोजणीसाठी 1 हजार रुपये ते 14 हजार रुपयांपर्यंत खर्च येत होता. या मोठ्या खर्चामुळे शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक भारत पडत होता. केवळ मोजणीसाठी त्यांना मोठी रक्कम मोजावी लागत होती. भूमी अभिलेख विभागाने आता शुल्क संरचनेत मोठा बदल केला आहे. पोटहिस्सा मोजणीसाठी आता केवळ 200 रुपये खर्च येणार आहे. हा निर्णय आता राज्यभर लागू करण्यात आला आहे.

हेही वाचा –  IndiGo चा नागपूर अधिवेशनाला फटका, आमदार- अधिकाऱ्यांची तिकिटे रद्द

महाभूअभिलेख संकेतस्थळावर शेतकऱ्यांना आता नवीन दरांची माहिती दिसेल. तसेच एकत्र कुटुंब पोटहिस्सा मोजणी हा पर्याय सुद्धा समाविष्ट करण्यात आला आहे. ई-मोजणी व्हर्जन 2.0 या संगणक प्रणालीतही अद्ययावत बदल करण्यात आले आहेत. जमिनीचे वाद कमी करण्यासाठी सरकारने हा बदल केला आहे. तर पोटहिस्सा मोजणीची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ होणार आहे. कुटुंबातील जमिनीच्या वाटणी संदर्भातील वाद यामुळे कुटुंबातील सदस्यांचा खिसा खाली होणार नाही. जमाबंद आयुक्त आणि भूमि अभिलेख विभागाच्या संचलाकांनी या संदर्भातील पत्र जारी केले आहे. यापूर्वी प्रतिहिस्सा मोजणी ही दोन प्रकारात होत होती. एक साधी आणि एक जलद अशा दोन प्रकारे मोजणी होत होती. त्यासाठी त्याप्रमाणे शुल्क आकारण्यात येत होते. जलद मोजणीसाठी शेतकरी कुटुंबातील सदस्यांना मोठा आर्थिक भार सहन करावा लागत होता. आता हा खर्च कमी झाला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button