Ruturaj Gaikwad Wedding : क्रिकेटर ऋतुराज गायकवाड अडकला लग्नबंधनात
Ruturaj Gaikwad : आयपीएलमध्ये आपल्या खेळीने क्रिकेटचं मैदान गाजवणारा पुण्याचा खेळाडू ऋतुराज गायकवाड अखेर विवाहबंधनात अडकला आहे. ऋतुराजने आयपीएल सीजन जिंकल्यानंतर होणाऱ्या पत्नीबरोबरचा फोटो शेअर केला होते. तेव्हापासून त्याच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर त्याने उत्कर्षा पवार हिच्याशी लग्नगाठ बांधली आहे.
ऋतुराज गायकवाड आणि उत्कर्षा पवार यांचं लग्न जवळच्या नातेवाईक आणि मित्रमंडळ यांच्या उपस्थितीत पार पडले. त्यांच्या लग्नाचे फोटोही समोर आले आहेत. या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्स करत त्याला नव्या इनिंगसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तर अभिनेत्री सायली संजीवने देखील ऋतुराज आणि उत्कर्षा यांच्या लग्नाचा फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा – Ola Electric : तब्बल ३५ हजारहून अधिक इलेक्ट्रिक स्कुटर्सची विक्री
गेले अनेक महिने अभिनेत्री सायली संजीवचं नाव ऋतुराज सोबत जोडलं जात होतं. ते दोघे ऐकमेकांना डेट करत असल्याचंही बोललं जात होतं. पण सायलीने अनेकदा या सर्व अफवा असल्याचं स्पष्ट केलं होतं. तर गेल्या आठवड्यात ऋतुराजने आपल्या होणाऱ्या पत्नीसोबत फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. अखेर तो आता लग्नबंधनात गुंतला आहे.