breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

COVID-19: पुण्यामध्ये आज दिवसभरात ४ जणांच्या मृत्यूची नोंद

महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

पुणे । प्रतिनिधी

पुणे शहरात बुधवारी दिवसभरात कोरोनाच्या संसर्गामुळे ४ जणांचा मृत्यू झाला. तसेच, अन्य ४०८ रुग्ण गंभीर आहेत, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

पुणे शहरात उपचार घेणाऱ्या ५ हजार ३९४ रुग्णांपैकी ४०८ रुग्ण गंभीर असून यातील २४६ रुग्ण व्हेंटिलेटरवर तर १६२ रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.

पुणे महापालिका हद्दीत नव्याने ४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ४ हजार ४७१ इतकी झाली आहे.

दिवसभरात ४ हजार १५० टेस्ट !

पुणे शहरात आज एकाच दिवसात ४ हजार १५० नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता ८ लाख २६ हजार ४०२ इतकी झाली आहे.

दिवसभरात नवे ३४७ कोरोनाबाधित !

पुणे शहरात आज नव्याने ३४७ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता १ लाख ७० हजार ६९७ इतकी झाली आहे.

अवश्य वाचा : पुण्याचं ‘मावळा पगडी’ मेट्रो स्टेशन

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button