#CoronoVirus:पुण्यात चार महिन्याच्या चिमुरड्याची कोरोनावर मात
![14 child deaths in 15 days in Melghat](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/baby-foot-Frame-copy-1.jpg)
पुणे : देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या दरम्यान पुण्यातून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील एका चार महिन्याच्या चिमुरड्याने कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्त चिमुरड्याला डॉक्टरांनी डिस्चार्ज देऊन त्याला घरी सोडलं आहे.
पुण्याच्या ससून रुग्णालयात या चिमुरड्यावर उपचार सुरु होते. चौदा दिवसांच्या उपचारानंतर बाळ ठणठणीत बरे झाल्यामुळे डॉक्टरांनीही बाळाला डिस्चार्ज दिला. येरवडा परिसरातील एका कुटुंबातील आजोबांना कोरोनाचा झाला होता. त्यामुळे त्यांच्या घरातील चार महिन्याच्या बाळालाही कोरोनाची लागण झाली होती.
आजोबांना कोरोनाची लागण झाल्यामुळे कुटुंबातील सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यावेळी तपासणी केली असता चार महिन्याचे बाळ पॉझिटिव्ह आढळून आलं होते. तर बाळाच्या आई-वडिलांचा अहवाल निगेटिव्ह आला होता. 13 एप्रिलपासून बाळावर ससून रुग्णालयात उपचार सुरु होते.
उपचारादरम्यान बाळाची आईही बरोबर होती. चौदा दिवसांनतर बाळाची दुसरी तपासणी केल्यानंतर बाळाचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतर डॉक्टरांनी बाळाला घरी सोडले.