#CoronoVirus:पुण्यात एका दिवसातील सर्वाधिक 143 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/Jmg9NDQwJmhhc2g9NjU5Nzc0MmIwOTU2ZTBhMzI0OTBkMjNjMDA2YzRjYjU.thumb_-1.jpg)
पुणे : पुणे जिल्ह्यात एका दिवसातील सर्वाधिक म्हणजे 143 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1491 वर पोहचली. पुण्यात कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचे वेग नऊ दिवसांवर गेला आहे.
पुणे जिल्ह्यात कालच्या दिवसात (मंगळवार 28 एप्रिल) तीन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत 83 कोरोनाग्रस्त रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. पुणे जिल्ह्यात मंगळवारी 20 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत 230 जण डिस्चार्ज मिळाल्याने घरी गेले आहेत. पुण्यात कोरोना रुग्णांचा दुप्पट होण्याचा वेग सातवरुन तर नऊ दिवसांवर गेला आहे.
राज्यात काल (28 एप्रिल) दिवसभरात तब्बल 729 नवे रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 9 हजार 318 वर पोहोचला आहे. विशेष म्हणजे मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6 हजारांवर गेली आहे.