breaking-newsताज्या घडामोडीपुणेमुंबई

#CoronaVirus: मुंबई, पुण्यातील नव्या करोना चाचणी केंद्रांना मान्यता; क्षमता बावीसशेपर्यंत वाढणार

करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता या रुग्णांची चाचणी करण्याकरीता अधिक चाचणी केंद्रे उपलब्ध व्हावेत, या दृष्टीने वैद्यकीय शिक्षण विभागाने डिपार्टमेंट ऑफ हेल्थ रिसर्च अँड इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चकडे आणखी केंद्रांना नव्याने मान्यता देण्याची विनंती केली होती. यानुसार मुंबईतील परळ येथील हाफकिन इन्स्टिट्यूट आणि पुण्यातील बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून जनरल हॉस्पिटल यांना करोना चाचणी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि खाजगी केंद्रांच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत करोना तपासण्यांची क्षमता शंभराहून बावीसशेपर्यंत वाढविण्यात येत आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली.

देशमुख म्हणाले, मुंबईतील भायखळा येथील जे. जे. महाविद्यालय रुग्णालयात अशा प्रकारचे चाचणी केंद्र उभारण्यात आले असून यालाही उद्याच मान्यता मिळणार आहे. यामुळे या तीनही तपासणी केंद्रातून दररोज सहाशे नमुन्यांची तपासणी करणे शक्य होणार आहे. सध्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अंतर्गत नागपूर येथे इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अशा चाचणीसाठी केवळ एकच केंद्र उपलब्ध आहे.

शासकीय रुग्णालयाच्या चाचणी केंद्रांना नव्याने मान्यता देण्याबरोबरच मुंबईतील सात खाजगी प्रयोगशाळांना करोना तपासणीसाठी मान्यता देण्यासंदर्भातही वैद्यकीय शिक्षण विभागाने केंद्र शासनाच्या डिपार्टमेंट ऑफ हेल्थ रिसर्च अँड इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चकडे केली होती. यानुसार पी. डी. हिंदुजा नॅशनल हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर, रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, टाटा मेमोरियल सेंटर ऍडव्हान्सड सेंटर फॉर ट्रीटमेन्ट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कँसर, मेट्रोपोलीस हेल्थकेअर लिमिटेड, थायरोकेयर लॅबरोटरीज, एस. आर. एल. डायग्नोस्टिक आणि रिलायन्स लॅबरोटरीज, नवी मुंबई या खासगी केंद्रांचा यात समावेश आहे. या प्रयोगशाळांना करोना तपासणीसाठी तत्वतः मान्यता देण्यात  आली आहे. दररोज प्रत्येकी १०० नमुने तपासण्याची या चाचणी केंद्रांची क्षमता आहे. काही तांत्रिक गोष्टी पूर्ण होताच या प्रयोग शाळांमधूनही करोनाची चाचणी उपलब्ध होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button