breaking-newsताज्या घडामोडीपुणे
#CoronaVirus: पुण्यात दिवसभरात आढळले ७२ कोरोनाबाधित रुग्ण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/corona-virus-2-3-1-3.jpg)
पुण्यात दिवसभरात ७२ करोनाबाधित रुग्ण आढळले. यामुळे शहरातील एकूण करोनाबाधितांची संख्या ११३९ इतकी झाली आहे. तर आज पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे मृतांची एकूण संख्या ७२वर पोहोचली आहे. १४ दिवसांनंतर चाचण्या निगेटिव्ह आलेल्या सहा रूग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच एकूण १६५ जणांना आजवर घरी सोडण्यात आले आहे. त्याचबरोबर ४४ गंभीर स्थिती असलेल्या रुग्णांवर अद्याप उपचार सुरू आहेत.