Breaking-newsपुणेमुंबईराष्ट्रिय
#CoronaVirus: पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक सक्रिय रुग्ण, तर मुंबई तिसऱ्या क्रमांकावर
![# Covid-19: The number of corona patients undergoing treatment in Palghar district has crossed two and a half thousand](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/el-coronavirus-no-esta-vivo-ni-muerto-2.jpg)
पुणे : पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा दररोज वाढत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जात असल्या तरीही दररोज मोठ्या प्रमाणात नव्या रुग्णांची भर पडत चालली आहे. पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक 36 हजार 810 सक्रिय रुग्ण आहेत. तर मुंबईत 23 हजार 704 सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबई शहरात आढळले आहेत.
मात्र, मुंबईतील परिस्थिती आता बऱ्यापैकी नियंत्रणात आलेली आहे. राज्यात पुण्यानंतर ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत. ठाण्यात सध्या 36 हजार 219 सक्रिय रुग्ण आहेत. तर सर्वाधिक सक्रिय रुग्णांच्या यादीत मुंबईचा तिसरा क्रमांक लागतो. दरम्यान, राज्यात सध्या एकूण 1 लाख 32 हजार 236 सक्रिय कोरोना रुग्ण आढळले आहेत.