breaking-newsताज्या घडामोडीपुणे
#CoronaVirus: पुण्यात आणखी दोघांना कोरोनाचा संसर्ग; महाराष्ट्राचा आकडा ३३८
राज्यातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या अडीचशेच्या जवळ गेली आहे. गुरूवारी यात आणखी तीन रुग्णांची भर पडली. यात पुण्यामध्ये दोन, बुलढाण्यामध्ये एक रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे राज्यातील करोनाग्रस्त रुग्णांचा ३३८ वर गेला आहे. चिंतेची बाब म्हणजे राज्याच्या वैद्यकीय शिक्षण खात्याच्या अहवालानुसार, देशात आढळलेल्या एकूण करोनाग्रस्तांमध्ये २२ टक्के रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. देशाच्या तुलनेत राज्यात या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण १ टक्का अधिक आहे.