breaking-newsताज्या घडामोडीपुणे

#CoronaVirus: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेचा ‘मिशन झिरो’ उपक्रम

पुणे: पुण्यात आता मिशन झिरो उपक्रम राबवण्यात येणार आहे. मालेगाव आणि धारावीमध्ये मिशन झिरो उपक्रम यशस्वी ठरल्यानंतर आता पुण्यातही राबविला जाणार आहे. पुणे महापालिकेने भारतीय जैन संघटनेच्या सहकार्याने हा उपक्रम हाती घेतलेला आहे. पुण्यात कोरोना अटकाव करण्यासाठी युद्धपातळीवरती प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात नुकतेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आढावा बैठकही पार पडलेली आहे. शहरात सर्वाधिक रोज साधारण पाच ते सहा हजार टेस्ट केल्या जात आहे त्याचबरोबर ट्रेसींगवर भर देण्यात आलेला आहे. तर मृत्यूदर कमी करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांवर, कोमॉर्बीड रुग्णांवर उपचार करण्यास भर देण्यात आलेला आहे. त्यामुळे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आणि मृत्यूचा दर कमी होत असल्याचे दिसते.

काय आहे मिशन झिरो उपक्रम ?

जास्तीत जास्त नागरिकांच्या तपासण्या करून रुग्ण शोधणे.

रॅपिड ऍक्शन प्लॅन तयार करणे.

फिरत्या दवाखाण्यांची संख्या वाढविणे.

कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करणे.

रिपोर्ट लवकर उपलब्ध करून देणे.

पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार.

रुग्णसंख्या अधिक असणाऱ्या भागातून ही मोहीम राबविणे.

पुणे जिल्ह्यात काल (8 ऑगस्ट) 2 हजार 639 नवीन कोरोना रुग्ण आढळले होते. यामध्ये पुणे शहरातील 1 हजार 290 जणांचा समावेश आहे. तसेच काल 70 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात मृत्यूंच्या आकड्याचा आजपर्यंतचा उच्चांक नोंदला गेलेला आहे.

पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांपाठोपाठ काल पिंपरी-चिंचवडमध्ये 987, जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात 220, नगरपालिका क्षेत्रात 60 आणि कंटेन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात 82 नवे रुग्ण आढळून आले. यामुळे पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 1 लाख पाच हजार 523 वर पोहोचली आहे. यापैकी 76 हजार 726 उपचारानंतर कोरोनामुक्त झालेले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button