Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

बायोमायनिंग प्रकरणाची चौकशी करण्याचे आयुक्तांचे आदेश

पुणे : उरुळी देवाची, फुरसुंगी कचरा डेपोतील जैविक उत्खननाची (बायोमायनिंग) निविदा प्रकरणाची महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी चौकशी करावी आणि या निविदेतील आर्थिक बाबींसंदर्भात मुख्य लेखा परिक्षकांनी अहवाल सादर करावा असे आदेश आदेश आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत.

पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागातर्फे बायोमायनिंगची निविदा काढण्यात आली. या बायोनायनिंगच्या निविदा, यापूर्वी दिलेली बिले यासह सध्या अस्तित्वात असलेल्या कचऱ्यात माती किती कचरा किती याची तपासणी करावी यासह अन्य मागण्यांसाठी शहर काँग्रेसच्या व्यापारी सेलचे अध्यक्ष भरत सुराणा यांनी महापालिका भवनासमोर दोन दिवसांपासून उपोषण सुरु केले आहे.

हेही वाचा     –    ऑलिम्पिक विजेत्या स्वप्नीलची राज्य सरकारकडून चेष्टा; स्वप्नील कुसाळेच्या वडिलांकडून खंत व्यक्त 

यावर महापालिका आयुक्तांच्या दालनात बैठक झाली. यावेळी सुराणा, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्याशी चर्चा झाली. त्यामध्ये आयुक्तांनी या प्रकरणाची अतिरिक्त आयुक्तांमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत

भरत सुराणा म्हणाले, ‘महापालिका आयुक्तांकडे झालेल्या बैठकीत त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांना आदेश दिले आहेत. या विषयातील सर्व माहितीही मला तातडीने द्यावी, यापूर्वी दिलेल्या बिलांची मुख्य लेखा परिक्षकांनी अहवाल सादर करावा असे आदेश आयुक्तांनी दिले. त्यामुळे उपोषण मागे घेतले आहे. योग्य पद्धतीने चौकशी न झाल्यास पुन्हा आंदोलन केले जाईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button