TOP Newsताज्या घडामोडीपुणे
पुण्यात 1 नोव्हेंबरपासून अनिश्चित काळासाठी CNG पंप बंद
![CNG pumps closed indefinitely in Pune from November 1](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/sports-7-780x470.jpg)
पुणे – पुण्यातील सीएनजी पंपधारकांनी आपला नियोजित संप बंद पुढे ढकलला आहे. २० ऑक्टोबरपासून सीएनजी पंपांनी बेदमुत CNG विक्रीचा बंद कऱण्याचा इशारा दिला होता. मात्र आता दिवाळीचे कारण सांगत संप पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रलंबित थकबाकी आणि व्याजासह डीलर्सच्या खात्यात कमिशन जमा होईपर्यंत अनिश्चित काळासाठी CNG सेल बंद ठेवण्याचा निर्णय पेट्रोल डिलर असोसिएशनने घेतला आहे.
आज टोरंट CNG संपाच्या मुद्द्यावर, जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली, सर्व 3 OMC (HPC, IOC, BPCL) आणि टोरेंट गॅसचे कार्यकारी संचालकांसह PDA व सह जिल्हा पुरवठा अधिकारी यांची बैठक पार पडली.