breaking-newsताज्या घडामोडीपुणे

दिलीप खेडकरविरुध्द गुन्हा दाखल; सरकारी कामकाजात अडथळा आणल्याची तक्रार

पुणे : वादग्रस्त माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिचे वडील दिलीप खेडकर यांच्याविरुध्द सरकारी कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. ८) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

तहसीलदार दिलीप आकडे यांनी दिलीप खेडकर यांच्याविरुध्द सरकारी कामकाजात अडथळा आणल्याची तक्रार बुधवारी (ता. ७) बंडगार्डन पोलिस ठाण्यात दिली होती. या अर्जाची चौकशी करण्यात आली. तहसीलदार आकडे यांचा जबाब नोंदविल्यानंतर खेडकर यांच्याविरुद्ध रात्री गुन्हा दाखल करण्यात आला, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी सांगितले.

हेही वाचा     –      स्पॅम कॉलची समस्या सुटणार, लागणार तब्बल ‘इतक्या’ वर्षांसाठी बंदी 

पूजा खेडकर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. त्यावेळी स्वतंत्र केबिनची मागणी केली होती. खासगी मोटारीवर अंबर दिवा लावल्याने चर्चेत आल्या होत्या. वडील दिलीप खेडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पूजाला स्वतंत्र केबिन द्यावे, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांवर दबाव आणला होता.

या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी राज्य सरकारकडे अहवाल पाठविला होता. त्यानंतर पूजा यांची वाशीम जिल्हाधिकारी कार्यालयात बदली झाली होती. दरम्यान, पूजा हिच्यावर झालेल्या आरोपांच्या चौकशीनंतर लोकसेवा आयोगाने तिची निवड रद्द केली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button