TOP Newsताज्या घडामोडीपुणे

गौरींसाठी नव्या साड्या, अलंकार खरेदीची लगबग

पुणे | लाडक्या गणरायाच्या आगमनानंतर आता गौरींसाठी नव्या साड्या, अलंकार तसेच मिठाई आणि फराळाचे जिन्नस खरेदीची सुवासिनींची लगबग सुरू झाली आहे. गौरी आवाहन केल्यानंतर सजावट करण्यासाठी आवश्यक साहित्य खरेदीची धामधूम असल्याने बाजारपेठेमध्ये गर्दी झाली आहे.
गणरायाच्या पाठोपाठ घरोघरी माहेरवाशीण गौरींचे शनिवारी (३ सप्टेंबर) आगमन होत आहे. करोना प्रादुर्भावामुळे दोन वर्षे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा लागला होता. त्यामुळे इच्छा असूनही गीैरीपूजनासाठी सुवासिनींना मोकळेपणाने खरेदी करण्याची संधी मिळाली नव्हती. ती कसर भरून काढत यंदा थाटामाटामध्ये घरोघरी गौरी आवाहनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे.

कुलाचारानुसार कोणाकडे गौरींचे पितळी, तर कोणाकडे शाडूचे मुखवटे असतात. काही घरांमध्ये गणपतीबरोबर गौरींचे शाडूचे मुखवटे विसर्जित केले जातात. त्यामुळे दरवर्षी नव्याने मुखवट्यांची खरेदी केली जाते. गौरी आगमनाच्या निमित्ताने गृहिणींनी जय्यत तयारी केली असून, पूजा साहित्य, सजावटीचे साहित्य आणि खिरापतीच्या नैवेद्यासह गौरींची आरास करण्यासाठी आवश्यक मिठाई आणि फराळाचे पदार्थ खरेदीसाठी तुळशीबाग-मंडई परिसरात शुक्रवारी गर्दी झाली होती. अर्थार्जन करणाऱ्या महिलांकडून फराळाचे पदार्थ करण्यासाठी अवधी हाताशी नसल्याने बाजारातून पदार्थ खरेदी करण्यावर भर देण्यात आला.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button