Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे
Breaking News : कोव्हिशिल्ड लस बनवणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग
![#BREAKING: 5 bodies found in Seram Institute building fire - Pune Mayor](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/Siram.jpg)
पुणे । प्रतिनिधी
पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटला आग लागली आहे. सीरमच्या नव्या इमारतीला आग लागली असून घटनास्थळी अग्निशामन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. ४ अग्निशामन दलाच्या गाड्या सीरममध्ये दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. दुपारी २ च्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळत आहे. सीरममध्ये कोरोनावरील लस अर्थात कोव्हिशिल्ड लस तयार करण्याचे काम सुरु आहे. आगीचे कारण अद्याप समजले नाही आहे.
Maharashtra: Fire breaks out at Terminal 1 gate of Serum Institute of India in Pune. More details awaited. pic.twitter.com/RnjnNj37ta
— ANI (@ANI) January 21, 2021