ताज्या घडामोडीपुणे

“मोहोळांच्या पाठीशी आता ब्राम्हण समाज मैदानात”, मोदींना पंतप्रधान करण्यासाठी पाठिंबा जाहीर

पुणे : महायुतीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना पुण्यात ब्राम्हण समाजाने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. यासंदर्भात ब्राम्हण समाजने मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात पंतप्रधान नरेद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आम्ही भाजपच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहण्याचा निर्णय घेत असल्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार मेधा कुलकर्णी आणि महायुतीचे सर्व नेते, पदाधिकारी उपस्थित होते.

माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी महायुतीच्या नेत्यांनी पुण्यात चांगलीच कंबर कसली आहे. ब्राह्मण समाज हा नेहमीच भाजपसोबत राहिलेला आहे आणि या निवडणुकीत देखील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी ब्राह्मण समाजातील सर्व संस्थांनी एकमुखाने महायुतीला आपला पाठिंबा जाहीर केला. असल्याचे मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – सांगलीची जागा ठाकरे गटाला, काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक

दरम्यान, ‘गेली २५ वर्षे ज्या भागातून मी राजकारण करत आहे, तो संपूर्ण भाग ब्राह्मण बहुल असून ब्राह्मण समाजाने नेहमीच मला प्रेम दिले आहे. माझ्यासाठी नेहमीच खंबीरपणे पाठीशी उभ्या राहणाऱ्या समाजाला मी देखील कोणतीही तक्रारीची संधी देणार नाही. देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातला भारत घडवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन पंतप्रधान मोदींचे हात बळकट केले पाहिजे. असा विश्वास मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.

यावेळी प्रामुख्याने शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मण मंडळाचे विश्राम कुलकर्णी, देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेचे राजेंद्र कुलकर्णी, सुनील पारखी, अखिल मध्यवर्ती ब्राह्मण संस्था नाशिकचे पुणे केंद्राचे विश्वनाथ भालेराव, ब्राह्मण महासंघाचे  चैतन्य जोशी, ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या ऍड. ईशानी जोशी, रिपाई ब्राह्मण आघाडीचे ऍड. मंदार जोशी, सर्व शाखीय ब्राह्मण महासंघाचे  अशोक जोशी, प्रमोद जोशी, परशुराम सेवा संघाचे सर्वश्री उपेंद्र जपे, ऋषिकेश सुमंत, स्वप्निल कुलकर्णी, धीरज जोशी, शैलेश खोपटीकर, डॉ. संजीवनी पांडे, श्रुती कुलकर्णी,अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे श्री.विजय शेकदार,वृषाली शेकदार, केतकी कुलकर्णी, पल्लवी गाडगीळ, आदींसह सर्वच संस्थांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button