पुणे अपघात प्रकरणात मोठी अपडेट, आरोपीबाबत पोलिसांचा कोर्टात खळबळजनक दावा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/mahaenews-12-780x470.jpg)
पुणे : पुण्यातील कोरेगाव पार्कमधील कल्याणीनगर येथे हिट अँड रन प्रकरणात अजुनही काही निकाल लागला नाही. अल्पवयीन मुलासह त्याचे आई-वडील, आजोबा आणि बार मालक यांच्यासह ससून रूग्णालयातील डॉक्टर तुरूंगात आहे. अशातच पुणे अपघात प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. अल्पवयीन मुलाची बाल न्याय हक्क मंडळातील सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी पोलिसांनी कोर्टात खळबळजनक दावा केला आहे.
तपास सुरु असल्याने मुलाला घरी सोडल्यास इतर नातेवाईकांच्या मदतीने तपासावर परीणाम करेल. बाल सुधारगृहात मुलाचे समुपदेशन सुरु आहे. ते पुर्ण व्हायचे आहे, त्यासाठी त्याला इथेच ठेवावे. .मुलाच्या घरी त्याची काळजी घ्यायला कोणी नाही. त्याच्या मनावर परिणाम हऊ शकतो. अल्पवयीन मुलाच्या जीवीताला बाहेर धोका होऊ शकतो. त्यामुळे त्याला बाल सुधारगृहात ठेवण्याची मागणी पोलिसांनी केली होती.
पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला आणखी 14 दिवस बालसुधारगृहात ठेवण्याची मागणी कोर्टाकडे केली. तर बचाव पक्षाने मुलाला घरी सोडण्याची विनंती केली होती. कोर्टाने कोठडी वाढवण्याचा निर्णय घेतला. अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा मुक्काम 18 जून पर्यंत बाल सुधार गृहातच असणार आहे.
बाल न्याय मंडळाचे नियमित मुख्य न्यायाधीश उपस्थित नव्हते त्या जागी दुसऱ्या न्यायाधीशांनी सुनावणी घेतली. मी नियमित न्यायाधीश नसल्याने अल्पवयीन आरोपीबाबतचा निर्णय 18 जूनला घेण्यात येईल अस म्हणत न्यायालयाने कामकाज स्थगित केलं. बाल न्याय मंडळाने अल्पवयीन आरोपीच्या रिमांड मध्ये २५ जूनपर्यंत वाढ केली.