लोणवळ्यातील भूशी डॅम ओव्हरफ्लो, पण पर्यटकांना नो एन्ट्री
![Bhushi Dam in Lonavla overflows, but no entry for tourists](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/bhushi-dam-696x447.jpg)
लोणावळा – लोणावळ्यातील प्रसिद्ध भुशी धरण ओव्हरल फ्लो झालं असून धरणाच्या पायऱ्यांवरून पाणी ओसंडून वाहत आहे. मात्र, भूशी धरण पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटकांचा चांगलाच हिरमोेड झाला आहे.
पुणे आणि मुंबईकरांच हक्काचं आणि आवडीचं पर्यटनस्थळ असलेलं भुशी धरण ओव्हर फ्लो झालं आहे. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी धरण खूप अगोदर भरल्याने पर्यटकांची पावलं आपसूकच धरणाच्या दिशेने पडत आहेत. गेल्या आठवडाभरापासून लोणावळा परिसरात मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी सतत कोसळत आहेत. याचमुळे लोणावळ्याचा परिसर अत्यंत नयनरम्य झाला असून डोंगर दऱ्या हिरवा शालू परिधान केल्याचा भास झाल्याशिवाय राहात नाही. सहयाद्रीच्या पर्वतरांगांच्या डोंगरकड्यांमधून छोटे मोठे धबधबे कोसळत असून त्याचा आनंद पर्यटक घेत आहेत.
गेल्या वर्षीपासून कोरोना महामारीचं संकट असून याचमुळे अद्याप या पर्यटनस्थळांवर भटकंती करण्यास नागरिकांना मज्जाव घालण्यात आला आहे. गेल्या रविवारी लोणावळ्याच्या सहारा पुलापाशी पर्यटकांनी एकच गर्दी केली होती. अक्षरशः लोणावळा पोलिसांना विनवणी करून त्यांना परत पाठवाव लागलं होतं. त्यामुळे लोणावळ्यातील पर्यटनस्थळी येण्याअगोदर एकदा नक्की विचार करणं गरजेचं आहे.