breaking-newsताज्या घडामोडीपुणे

कोरोना संकटात रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्यांना अटक

पुणे |महाईन्यूज|

रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा (Remdesivir injection shortage) जाणवत आहे. मात्र, या संकट काळातच काही जण रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करत आहेत. अशाच प्रकारे रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

रेमडेसिवीर इंजेक्शन ब्लॅकमध्ये 10,000 रुपयांना विक्री करत असल्याची माहिती पुण्यातील गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पुणे पोलीस आणि एफडीएच्या अधिकाऱ्यांनी मिळून संयुक्तपणे कारवाईसाठी सापळा रचला. एक डमी ग्राहक वाघोली परिसरात पाठवला आणि आरोपीला दोन रेमडेसिवीर इंजेक्शनसह ताब्यात घेतले.

अशाच प्रकारे डिमेलो पेट्रोलपंज नगर रोड जवळ एक व्यक्ती 18,000 रुपयांत रेमडेसिवीर इंजेक्शन विक्री करत असल्याची माहिती पोलसाांना मिळाली होती. या ठिकाणी पुण्यातील गुन्हे शाखा युनिट 4 ने डमी ग्राहक पाठवून मोहम्मद मेहबुब पठाण आणि त्याच्या तीन साथीदारांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी रेमडेसिवीर इंजेक्शनच्या दोन बॉटल्स जप्त केल्या आहेत. यावर असे छापण्यात आलेले आहे.

ही इंजेक्शन शासकीय रुग्णालयांना पुरवठा केलेली असून आरोपींनी आर्थिक फायद्यासाठी काळ्या बाजारातून जास्त किमतीने विक्री करण्यासाठी दौंड येथून मिळवल्याची माहिती समोर आली आहे. या रॅकेटमधील 4 आरोपींना पोलिसांनी पकडले असून ही एक मोठी टोळी असण्याचा अंदाज पोलिसांना आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button