शिवशाहिरांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अमित शहा यांनी वाहिली श्रद्धांजली
![amit-shah-paid-homage-to-vahili-by-offering-flowers-to-the-image-of-shivshahir](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/FG-02yrVQAMSMDK-e1639976446977.jpg)
पुणे | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुण्यातील दिवसभरातील विविध कार्यक्रम उरकल्यानंतर त्यांनी रविवार रात्री दिवंगत बाबासाहेब पुरंदरे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं. त्याचबरोबर शिवशाहिरांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली.यावेळी पुरंदरेंच्या कार्याचा गौरव करताना अमित शहा म्हणाले, “आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य आणि धर्मपरायणतेचा गौरवशाली इतिहास आपल्या अद्भुत लेखनाने आणि ओजस्वी वाणीने जनमानसात रुजवला. तसेच याद्वारे राष्ट्र आणि धर्म रक्षणाची अखंड ज्योत पेटवली”
आज पुणे में स्व. बाबासाहेब पुरंदरे जी के घर जाकर उनको श्रद्धांजलि अर्पित की।
आपने छत्रपति शिवाजी महाराज जी के शौर्य व धर्मपरायणता के गौरवशाली इतिहास को अपने अद्भुत लेखन व तेजस्वी वाणी से चिरस्मरणीय बनाकर देशवासियों के हृदय में राष्ट्र व धर्म की रक्षा की अखंड ज्योति जगाई है। pic.twitter.com/WmnBdZJTPc
— Amit Shah (@AmitShah) December 19, 2021
दरम्यान, बाबासाहेब पुरंदरे यांचं स्वप्न असलेल्या शिवसृष्टीच्या कामाचा आढावाही यावेळी गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला. शिवसृष्टीच्या कामाची सद्यस्थिती जाणून घेताना ती पूर्णत्वास नेण्यासाठी काय करावे लागेल? अशी विचारणाही त्यांनी संबंधितांकडे केली.