पुण्यातील सर्व पर्यटनस्थळे खुली; कलम १४४ रद्द
![All tourist destinations in Pune open; Section 144 repealed](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/Untitled-design-1.jpg)
पुणे | प्रतिनिधी
मागील काही दिवसातील जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती पाहता पुणे जिल्ह्यात आता काही निर्बंध उठवण्यात आले असून जिल्ह्यातील सर्व जलतरण तलाव, खुली मैदाने, पर्यटनाच्या ठिकाणी असलेली सर्व दुकाने, हॉटेल्स आणि पर्यटनस्थळे आज सोमवारपासून खुली करण्यात येत आहेत, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जाहीर केले आहे. या आदेशानुसार लागू असलेले कलम १४४ रद्द करण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यासह मावळातील पर्यटनस्थळे आज सोमवारपासून खुली करण्याचे तसेच लोणावळा परिसरातील दुकाने खुली करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत. मावळमधील लोणावळा हा पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जातो. या पर्यटनस्थळांवर छोट्या व्यवसायिकांना व्यवसाय करण्याची मुभा द्या, अशा सूचना राज्याचे पालकमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी काल जिल्हा आढावा बैठकीत दिले होते.