breaking-newsताज्या घडामोडीपुणे

मोठी अपडेट समोर, पुणे जिल्हाधिकाऱ्यांवर छळ केल्याचा आरोप करणं पूजा खेडकरला पडणार महागात

पुणे : बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकरच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पूजा खेडेकरने पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर छळ केल्याचा आरोप केला होता. पूजा खेडकर पुण्यामध्ये प्रशिक्षणार्थी होती. मात्र तात्काळ तिची बदली वाशिम येथे करण्यात आली होती. प्रमाणपत्रांवरून आरोप होत असताना पूजा खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकारी  यांच्यावर छळाचा आरोप केला होता. वाशिम पोलीस पूजा खेडकर यांच्या शासकीय विश्रामस्थळी पोहोचले होते. त्यावेळी पोलिसांकडे त्यांनी पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवे यांच्यावर छळ केल्याचा आरोप केला. यावेळी वाशिम पोलिसांनी तक्रारीची नोंद केली होती. आता सुहास दिवसे पूजा खेडकरविरोधात अब्रूनुकसानीचा दावा करणार असल्याची माहिती समजत आहे. त्यासोबतच बदनामी केल्याने सुहास दिवसे गुन्हासुद्धा दाखल करण्याच्या तयारीमध्ये आहेत.

हेही वाचा     –      ‘बांगलादेशातून समजून घ्यावं आरक्षण किती महत्वाचा विषय’; मनोज जरांगे पाटील

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) पूजा खेडकरची प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी म्हणून केलेली निवड रद्द केली आहे. भविष्यात आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या कोणत्याही परीक्षेला बसण्यासही बंदी घालण्यात आली आहे. यूपीएससीने त्याला अनेक वेळा बनावट ओळख वापरून परीक्षेत बसल्याबद्दल दोषी ठरवले आहे. यूपीएससीने एका निवेदनात म्हटले आहे की, खेडकर ही नागरी सेवा परीक्षेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळी आहे.

महाराष्ट्राच्या बडतर्फ IAS पूजा खेडकरच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयात 7 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. यूपीएससीच्या निर्णयाला पूजा खेडकरने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. माजी आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर हिने सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात फसवणूक आणि बनावटगिरीच्या आरोपाखाली धाव घेतली. यामध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) निर्णयाला आव्हान दिले आहे.  उमेदवारी रद्द करून त्यांना भविष्यातील सर्व परीक्षा आणि निवड प्रक्रियेपासून दूर ठेवण्याचा निर्णय चुकीचा असल्याचं खेडकरच्या वकिलाने म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button