‘आगे आगे देखो होता है क्या!’; पिंपरी, भोसरीतील राजकीय उलथापालथीचे रोहित पवारांकडून संकेत

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु झालेली आहे. अजित पवारांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवडमधून अजित पवार गटात इन्कमिंग वाढलेले आहे. पिंपरी आणि भोसरीमध्ये २० तारखेला मोठा राजकीय बदल दिसणार असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे. या दाव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत तर राजकीय वर्तुळात याबाबत चर्चा सुरु झालेल्या आहेत.
शरद पवार गटामध्ये इनकमिंग वाढत चालल्याने पक्षात कॉन्फिडन्स वाढला आहे. ” पिंपरी भोसरीमध्ये २० तारखेला काय होतेय तुम्ही पहालच, आगे आगे देखो होता है क्या! असे म्हणत आमदार रोहित पवार यांनी फोडाफोडीच्या राजकारणाला जशास तसे उत्तर दिले आहे.
पिंपरी चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र या बालेकिल्ल्यातच अजित पवारांना एका मागून एक धक्का बसायला सुरुवात झाली आहे. पिंपरी चिंचवडमधील अजित पवारांच्या सोबत असलेले अनेकजण शरद पवार गटात जाण्यास इच्छुक आहेत. काहींनी शरद पवार गटात प्रवेशही केलेला आहे. दरम्यान आता २० जुलै ला शरद पवार यांची पिंपरी चिंचवडमध्ये सभा होणार आहे.
हेही वाचा – मेट्रोला पडला सुशोभीकरण पुनर्स्थापनेचा विसर
अजित पवार गटातील अनेक पदाधिकारी आता शरद पवार गटाच्या वाटेवर आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल वाकडकर आणि पिंपरी विधानसभेचे अध्यक्ष विशाल काळभोर यांनी अजित पवार यांची साथ सोडत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला.
अनेकांना राजकीय भवितव्याची चिंता आहे. शहराध्यक्ष अजित गव्हाणे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. चिंचवड पोटनिवडणूक लढवलेल्या नाना काटे यांनी काहीही झाले तरी निवडणूक चिन्हावरच लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली होती, त्यात शरद पवार यांनी सर्वांसाठी दरवाजे खुले ठेवण्याची घोषणा केली होती. आता याच दारातून नाना काटे परतण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच आता राजकीय उलथापालथीचे रोहित पवारांकडून संकेत देण्यात आले आहेत. त्यामध्ये त्यांनी भोसरी आणि पिंपरी मतदारसंघाचा उल्लेख केल्याने राजकीय तर्क वितर्कांना उधाण आले आहे.
चांगल्या कामाची सुरुवात ही गणरायाच्या दर्शनाने केली जाते आणि आज अंगारकी असल्याने माझ्या पक्षाचे आमदार, मंत्री आणि पदाधिकारी यांना घेऊन दर्शनाला आलो आहे. १४ जुलै रोजी बारामतीमध्ये आमची जाहीर सभा होत असल्याने त्याची सुरुवात आज केल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, कृषीमंत्री धनंजय मुंडे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील,अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, प्रदेश प्रवक्त्या वैशाली नागवडे, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, महिला नेत्या सुरेखाताई ठाकरे, पक्षाचे आमदार,माजी आमदार, सिध्दीविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आमदार सदा सरवणकर, विश्वस्त सुनिल गिरी, आरती साळवी आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.




