मिहिर शाह रेड बुल प्यायला होता; पब मालकाचं वक्तव्य

Worli Hit and Run Case | मुंबईतल्या वरळी भागातली हिट अँड रनची घटना ही रविवारी पहाटे घडली. या घटनेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे राजेश शाह यांचा मुलगा मिहीर हा आरोपी आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित मिहीर शाह सध्या फरार आहे. दरम्यान हा अपघात होण्यापूर्वी मिहीर आणि त्यांचे चार मित्र एका पबमध्ये गेले होते. या मिहीरने ज्या पबमध्ये पार्टी केली त्या पब मालकाचं वक्तव्य आता समोर आलं आहे.
हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शाह रात्री जुहू येथील बारमध्ये मद्यप्राशन करत होता. त्यानंतर तो गोरेगावला गेला. घरी गेल्यानंतर त्याने त्याच्या चालकाला सांगितलं की आपल्याला लाँग ड्राईव्हवर जायचं आहे. प्रवासादरम्यान तो मुंबईतल्या वरळी भागात आला. त्यानंतर पुन्हा गोरेगावला जायला निघाला. गोरेगावला जाताना मिहीर शाह स्वतः कार चालवत होता असा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. तसंच जो अपघात झाला तो एट्रिया मॉलजवळ झाला. तिथपासून त्याने कावेरी नाखवा यांना फरपटत नेलं. हा अपघात झाला तेव्हा मिहीरने मद्यप्राशन केलं होतं.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमध्ये अत्याधुनिक ड्रोनव्दारे मालमत्तांच्या सर्वेक्षणाचा ‘श्रीगणेशा’
पबच्या मालकाने काय म्हटलं?
मिहीर शाह आमच्या पबमध्ये आला होता, त्याच्याबरोबर त्याचे चार मित्र होते. त्यांनी सगळ्यांनी जेवणाची ऑर्डर दिली. तसंच मद्यही मागवलं. मात्र मिहीर रेड बुल प्यायला होता. रेड बुल हे एक एनर्जी ड्रिंक आहे. बाकी काही नाही. शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ते सगळे जण आले. त्यांनी जेवण आणि मद्य घेतलं त्यानंतर साधारण साडेअकराच्या सुमारास ते गेले. मात्र मिहीरने मद्यप्राशन केलं नव्हतं. त्याने फक्त रेड बुल हे एनर्जी ड्रिंक घेतलं. पोलीस या प्रकरणी आता सीसीटीव्ही फुटेजही तपासत आहेत. तसंच हे चौघेजण ज्या कारने आले मर्जिडीजने आले होते. अपघात झालेल्या कारशी पबचा काहीही संबंध नाही, असं पबच्या मालकाने म्हटलं आहे.





