ताज्या घडामोडीपुणे

सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाट्याजवळ तरुणाची कोयत्याने वार करून हत्या

पुणे |  सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाट्याजवळ एका तरुणाची पाच ते सहा जणांनी कोयत्याने वार करून हत्या केल्याची घटना काल, बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. मारुती लक्ष्मण ढेबे (२०) असे या मृत तरुणाचे नाव असून तो सध्या वारजे येथे राहत होता.

मृत मारुती ढेबे हा मूळचा हवेली तालुक्यातील धनगरवस्ती, नांदेड येथील रहिवासी होता. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. हवेली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारुती ढेबे हा नांदेड फाट्यापासून नांदेड गावाकडे जाणाऱ्या रस्त्याला लागून असलेल्या बालाजी स्क्रॅप सेंटर या दुकानात बसलेला होता. त्यावेळी तोंडाला रुमाल बांधून आलेल्या पाच ते सहा जणांनी त्याच्यावर अचानक कोयत्याने हल्ला केला. त्यात ढेबे याचा जागीच मृत्यू झाला. वर्दळीचा रस्ता असल्याने हल्ला झाल्यानंतर या ठिकाणी मोठा गोंधळ निर्माण झाला होता. परिसरातील नागरिक व व्यवसायिकांमध्ये या घटनेमुळे मोठी दहशत निर्माण झाली आहे. दरम्यान, हवेली पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button