breaking-newsताज्या घडामोडीपुणे
नवले पुलाजवळ अपघाताची मालिका सुरूच; ३ ते ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती
पुणे – नवले पुलावर होणारी अपघाताची मालिका थांबण्याची चिन्हे अजुनही दिसत नाहीत. आज मंगळवारी पुन्हा एकदा अपघात झाला असून यात ३ ते ४ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. उतारावर कंटेनर मागे सरकल्यानं पाठिमागून येणाऱ्या वाहनांना त्याची धडक बसल्यानं हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मुंबईकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या कंटेनरचा ब्रेक निकामी झाला. यामुळे चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कंटेनर उताराच्या दिशेने मागे सरकल्यानंतर पाठिमागून येणाऱ्या वाहनांना त्याची धडक बसली. यामध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा समावेश आहे. अद्याप मृतांचा किंवा जखमींचा नेमका आकडा समोर आलेला नाही.