पुण्यात मित्राचा बर्थडे साजरा करण्यासाठी गेलेल्या 15 वर्षीय मुलाचा तलावात बुडून मृत्यू
पुणे | पुण्याजवळील बोपदेव घाटातील पठारवाडी तलावात बुडून एका 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी काही तरुण या ठिकाणी गेले होते, त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली. अनिश तानाजी खेडेकर (वय 15, रा. धनकवडी) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे.याप्रकरणी अधिक माहिती अशी की, धनकवडी येथील एका मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी नऊ मुले बोपदेव घाटात गेले होते. केक कापल्यानंतर ही मुले बोपदेव घाटापासून जवळच असलेल्या पठारवाडी येथील तलावाजवळ गेले. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास फोटो काढण्यासाठी ते तलावाच्या पाण्यात उतरले होते. त्यावेळी अनिस खेडकर आणि आणखी एक जण पाण्यात बुडू लागला. सोबत असणाऱ्या इतर मुलांनी एका मुलाला बाहेर काढले परंतु अनिस मात्र पाण्यात बुडाला. कशा मित्रांनी आणि चा शोध घेतला परंतु तो सापडला नाही.त्यानंतर रात्री दहा वाजता अग्निशमन दलाच्या याची माहिती देण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन लाईफ रिंगच्या मदतीने अनिषचा मृतदेह बाहेर काढला.