पवना धरण परिसरात गेल्या 24 तासात 51 मिली मीटर पाऊस
![Pavana Dam is 100 percent full](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/04/Pavna-Dam-696x398.jpg)
पुणे – पिंपरी-चिंचवडकरांसह मावळवासीयांची तहान भागविणाऱ्या पवना धरण पाणलोट क्षेत्र परिसरात पावसाने हजेरी लावली. गेल्या 24 तासात धरण परिसरात 51 मिली मीटर पावसाची नोंद झाली असून धरणात एकूण 33.60 टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी आजच्या तारखेला एवढाच पाणीसाठा होता.
मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवकरांना पाणीपुरवठा केला जातो. रावेत येथील बंधाऱ्यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो. सेक्टर 23 निगडी येथे पाणी शुद्ध करुन शहरवासीयांना पुरवठा केला जातो. पवना धरण परिसरात पावसाने दडी मारली होती. दोन दिवसांपासून पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. रिमझिम पाऊस पडत असून धरणातील पाणी साठ्यात वाढ होऊ लागली आहे.
पवना धरणातील पाण्याची परिस्थिती!
# गेल्या 24 तासात झालेला पाऊस = 51मि.मि.
# 1 जूनपासून झालेला पाऊस = 625मि.मि.
# गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस = 410
# धरणातील सध्याचा पाणीसाठा = 33.60% टक्के
# गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा = 33.60% टक्के
# गेल्या २४ तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ = 0.17% टक्के
# 1 जूनपासून पाणीसाठ्यात झालेली वाढ = 2.01% टक्के