breaking-newsपुणे

31 डिसेंबर रोजी रात्रभर वाहतूक सिग्नल कार्यरत राहणार, वाहतूक पोलिसांची माहिती

पुणे | महाईन्यूज | प्रतिनिधी

सरत्या वर्षाला (2019) निरोप देऊन नववर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाई सज्ज असते. यासाठी 31 डिसेंबर रोजी रात्रभर वाहतूक सुरू असते. त्याअनुषंगाने पुणे पोलीस आयुक्तालयाकडून रात्रभर वाहतूक सिग्नल सुरू ठेवले जाणार आहेत. यासंदर्भात वाहतूक पोलिसांनी पुणे महापालिकेला पत्र दिले आहे.

नववर्षाचे स्वागत करण्यासाठी शहरात विविध ठिकाणी कार्यक्रम साजरे केले जातात. नागरिक देखील सहकुटुंब फिरायला बाहेर पडतात. मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यावर येत असतात. काही भागात वाहतूक कोंडी होते. अन्य रात्री 12 ते सकाळी 7 वाजेपर्यंत सिग्नल व्यवस्था बंद ठेवली जाते. मात्र, यावर्षी 31 डिसेंबर ते 1 जानेवारी पहाटे 5 वाजेपर्यंत सिग्नल व्यवस्था चालू राहणार आहे. याबाबतचे वाहतूक पोलिसांनी पुणे महापालिकेला पत्र दिले आहे. नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button