Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
लोकप्रतिनिधींकडून दुबार नावांबाबत तक्रारी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/138967765_1990003124624143_4.jpg)
पुणे – प्रारूप मतदार यादीमध्ये किमान दोन ते अडीच लाख तरुण नवमतदारांची नोंदणी अपेक्षित होती. परंतु दहा हजारांच्या जवळपास नोंदणी झाली आहे. तरुण मतदारांनी नावनोंदणीसाठी पुढे यावे. तसेच, त्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने प्रयत्न करावेत, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले. यावेळी लोकप्रतिनिधींनी मतदारयादीत हजारो दुबार नावे असून, ती वगळण्याची मागणी केली.
डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली खासदार, आमदार आणि मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार शिवाजीराव आढळराव, अनिल शिरोळे, आमदार महादेव बाबर, जगदीश मुळीक, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.