पुण्यात सहकारनगरमध्ये 22 तर मुंढव्यात 27 वर्षीय तरुणीवर बलात्कार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/Rape.jpg)
पुणे- पुण्यातील महिला अत्याचाराच्या घटना काही थांबण्याचे नाव घेत नाहीत. अशाच महिला अत्याचाराच्या आणखी दोन घटना पुणे शहरातून उघडकीस आले आहेत. सहकारनगर पोलिस ठाणे आणि मुंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मुंडवा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात एका 27 वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. त्यानुसार नदीम बाबू शेख (वय 32, रा. मुंबई) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आणि फिर्यादी तरुणी हे मित्र आहे. आरोपीने फिर्यादीचे घरी घेऊन गुंगीचे औषध देऊन पीडित तरुणीसोबत शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादी सोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. या सर्व प्रकारानंतर पीडित तरुणी ही गर्भवती राहिली. त्यानंतरही आरोपीने लग्न न करता तिची फसवणूक केली. मुंढवा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
दुसरी घटना सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी एका 22 वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. त्यानुसार आरोपी शुभम सिताराम शिंदे (वय 19) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे. आरोपी आणि फिर्यादी हे ओळखीचे आहेत. आरोपीने फिर्यादीला वाढदिवसाची पार्टी देण्याच्या बहाण्याने तळजाईच्या जंगलात नेले.
तिथे गेल्यानंतर आरोपीने आणखी एक मित्र आणि फिर्यादी सह मद्यप्राशन केले. मद्यप्राशन केल्यानंतर फिर्यादी यांना थंडी वाजत असल्यामुळे त्या तिथेच साईडला झोपल्या होत्या. यावेळी आरोपीने फिर्यादीच्या अंगावरील कपडे काढून जबरदस्तीने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.