breaking-newsताज्या घडामोडीपुणे
20 एप्रिलला होणार विषय समिती सदस्यांची निवड
शिवसेना, राष्ट्रवादीने मागविले नगरसेवकांचे अर्ज
पिंपरी – महापालिकेच्या विविध विषय समिती सदस्यांची निवड शुक्रवारी (दि.20) सर्वसाधारण सभेत होणार आहे. याकरिता भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीने इच्छुक नगरसेवकांचे अर्ज मागविले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी समिती, शहर सुधारणा समिती, महिला व बाल कल्याण समिती आणि क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीच्या सदस्य पदाच्या नियुक्त्या 20 एप्रिल रोजी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत होणार आहेत. या सर्व समित्यांमध्ये सदस्यपदासाठी इच्छूक असणा-या नगरसेवकांकडून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना अर्ज मागविले आहेत. संबंधित इच्छूकांनी आपले अर्ज आपआपल्या पक्षाच्या कार्यालयात अर्ज आणून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.