होळी, धूलिवंदनानिमित्त पुण्याहून १३ विशेष रेल्वे गाड्या सुटणार; जाणून घ्या कसे आहे वेळापत्रक

पुणेः होळी आणि धूलवंदनानिमित्त कुटुंबियांसोबत आनंदाची धूळवड साजरी करण्यासाठी अनेकजण गावी जात असतात. यामुळे सार्वजनिक वाहतूकीत मोठी वाढ होत असते. याचा विचार करत होळीसाठी पुणे रेल्वे विभागाने १३ जादा लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच गर्दी होऊ नये म्हणून मोठी खबरदारी देखील रेल्वे प्रशासनाने घेतली आहे.
पुणे रेल्वे विभागाने होळीनिमित्त पुणे ते दानापूर, गोरखपूर आणि मुझफ्फरपूरसाठी एकूण 13 विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांचे हाल होऊ नये म्हणून रेल्वे स्टेशनवर मोठा मंडप टाकण्यात आला आहे. याबाबत पुणे विभागीय रेल्वे मंडळाचे अध्यक्ष राजेश कुमार वर्मा यांनी माहिती दिली आहे.
होळी सणादिवशी काही समाजकंटकाकडून धावत्या रेल्वे गाड्यांवर रंगाचे, पाण्याचे फुगे फोडण्याचे प्रकार घडत असतात. त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. तसेच डोळ्याला इजा होण्याची भीती देखील असते. रेल्वे पटरीजवळील दाट लोक वसाहतमध्ये हा प्रकार आढळतो. यावर आता लोहमार्ग पोलिसांनी कारवाईचा इशारा दिला आहे.
धूलिवंदनानिमित्त लोहमार्ग पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. धावत्या रेल्वे गाड्यांवर रंगाने भरलेले फुगे फेकल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे लोहमार्ग पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले आहे. धूलिवंदनानिमित्त मोठ्या प्रमाणावर रंग खेळला जातो. काही जणांकडून धावत्या रेल्वे गाड्यांवर रंगाने भरलेले फुगे फेकण्याचे प्रकार घडताना दिसतात. या प्रकारांना आळा घालण्यासाठी पुणे रेल्वे विभागाकडून खबरदारी घेण्यात आली आहे.
हेही वाचा – ‘ज्या लोकांना रंगांचा त्रास होत असेल त्यांनी देश सोडून जावं’; मंत्र्याचं वक्तव्य
रेल्वेचे वेळापत्रक
पुणे-दानापुर-पुणे विशेष (२ फेऱ्या) गाडी क्रं (०१४१९) विशेष ट्रेन पुणे येथून ११.०३.२०२५ रोजी १९:५५ वाजता सुटेल आणि तिसर्या दिवशी ०४.३० वाजता दानापुर येथे पोहोचेल. गाडी क्र.(०१४२०) ही विशेष ट्रेन दानापुर येथून १३.०३.२०२५ रोजी ०६:३० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसर्या दिवशी १७:३५ वाजता पोहोचेल. पुणे – मालदा टाउन विशेष ट्रेन (२ फेऱ्या) गाडी क्रं (०३४२६) विशेष ट्रेन पुणे येथून २३.०३.२०२५ रोजी २२.०० वाजता सुटेल आणि तिसर्या दिवशी १६.३० वाजता मालदा टाऊन येथे पोहोचेल. गाडी क्रं (०३४२५) ही विशेष ट्रेन मालदा टाऊन येथून २१.०३.२०२५ रोजी १७.३० वाजता आणि तिसर्या दिवशी ११.३५ वाजता पुणे येथे पोहोचेल
हडपसर-हिसार विशेष ट्रेन (४ फेऱ्या) गाडी क्रं (०४७२६) ही विशेष ट्रेन हडपसर येथून १०.०३.२०२५ आणि १७.०३.२०२५ रोजी १७.०० वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी २२.२५ वाजता हिसार येथे पोहोचेल. गाडी क्रं (०४७२५) ही विशेष ट्रेन हिसार येथून ०९.०३.२०२५ आणि १६.०३.२०२५ रोजी ०५.५० वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी १०.४५ वाजता हडपसर येथे पोहोचेल. कलबुर्गी- सर एम विश्वसरया टर्मिनल बेंगळुरू विशेष – (४ फेऱ्या) गाडी क्रं (०६५२०) ही विशेष ट्रेन कलबुर्गी येथून १४.०३.२०२५ आणि १५.०३.२०२५ रोजी ०९.३५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी २०.०० वाजता बेंगळुरू येथे पोहोचेल. गाडी क्रं (०६५१९) ही विशेष ट्रेन बेंगळुरू येथून १३.०३.३०२५ आणि १४.०३.२०२५ रोजी रात्री २१.१५ वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी सकाळी ७.४० वाजता कलबुर्गी येथे पोहोचेल.





