स्कूल व्हॅन जळून खाक; कोणतीही जीवितहानी नाही
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/7.jpg)
पुणे |महाईन्यूज|
देहूरोडजवळ आज (सोमवारी) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास एका स्कूल व्हॅनला आग लागल्याची घटना घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी, जखमी झालेले नाही.
हुजूरपागा शाळेची स्कूल व्हॅन आंबेगाव परिसरातील शालेय मुलांना सोडून पुन्हा कात्रजकडे जात होती. जुना आंबेगाव ढाबा डी मा र्टजवळ स्कूल व्हॅन आल्यानंतर गाडीला आग लागली असल्याचे चालक विश्वनाथ गांडले यांच्या लक्षात आले.
त्यानंतर त्यांनी तात्काळ गाडी मुख्य रस्त्यावरून बाजूला घेत अग्निशमन दलास कळविले. अग्निशमन दलाचे जवान येईपर्यंत चालक गांडले यांनी स्कूल व्हॅनमध्ये असलेल्या अग्निशमन यंत्राने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात अयशस्वी ठरले. कात्रज अग्निशमन दलाची मदत येईपर्यंत गाडी पूर्ण जळून खाक झाली होती. गाडीला आग लागल्याचे लक्षात आल्यावर तात्काळ खाली उतरल्याचे प्रसंगावधान राखल्यामुळे प्राण बचावले असल्याचे चालक विश्वनाथ गांडले यांनी सांगितले.