breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

सेल्फीच्या नादात दोघेजण पुराच्या पाण्यातून वाहून गेले

पुणे |महाईन्यूज|

पुण्यात बुधवारी जोरदार पाऊस झाल्यानंतर खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. नदीला सोडलेले पाणी पाहण्यासाठी आलेले दोन तरुण सेल्फी काढताना बुडल्याची घटना शुक्रवारी सहा वाजण्याच्या सुमारास वटेश्वर घाटावर घडली. यावेळी पाण्याच्या प्रवाहाबरोबर दोघेही वाहत गेले.

ओम तीमप्पा तुपधर (वय 18) आणि सौरभ सुरेश कांबळे( वय 20, दोघे रा. ताडीवाला रोड ) अशी पाण्यात बुडालेल्या दोघांची नावे असून दोघेही शिक्षण घेत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धरण क्षेत्रात पाऊस होत असल्याने पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे मुळा मुठा नदी दुथडी भरून वाहत आहे. आज संध्याकाळी सहाच्या सुमारास सौरभ व ओमकार आणि दोन मित्र बाबा भिडे पुलानजीक फोटो काढत होते. कपडे काढून ते पाण्यात उतरून फोटो काढत असताना एकजण वाहून जाऊ लागला. यावेळी त्याला वाचविण्यासाठी त्याचा मित्र सौरभ गेला. पण पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दोघेही वाहून गेले.

यावेळी तिसऱ्या मित्राने व नागरिकांनी याची माहिती दिली. घटनेची माहिती समजताच अग्निशमन दलाचे जवान मुलांचा शोध घेण्यासाठी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. दोघांचा ही अद्याप शोध लागला नसून नातेवाईकांनी नदीजवळ मोठी गर्दी केली आहे. दोन्ही तरुणांचा शोध घेतला जात असून त्यांचा शोध घेतला जात आहे, असे अग्निशमन दलाचे अधिकारी नाईकनवरे यांनी सांगितले. डेक्कन पोलिसही घटनास्थळी दाखल झाले असून त्याच्याकडून माहिती घेण्याचे काम सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button