breaking-newsताज्या घडामोडीपुणे

सुप्रिया सुळे, पार्थ पवार, अमोल कोल्हेंनी घेतली राहुल गांधींची भेट!

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्ह्यातील उमेदवारांनी आज सकाळी कोरेगाव पार्क येथील हॉटेल वेस्ट इन इनमध्ये भेट घेतली. बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे, मावळचे उमेदवार पार्थ पवार तसेच शिरूरचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी राहुल यांची भेट घेतली. तसेच पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातील आघाडीच्या तयारीबाबत माहिती दिली.

यावेळी पुणे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, पुणे शहराध्यक्ष चेतन तुपे, जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार उपस्थित होते.

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आज सकाळी पुणे दौ-यावर होते. पाच तासाच्या छोटेखानी पुणे दौ-यात राहुल यांनी काँग्रेस आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच पुण्यातील युवा स्वराज प्रतिष्ठान व पुणे शहर युवक काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थी संवाद कार्यक्रमाला राहुल यांनी संबोधित केले. त्याआधी राहुल हे कोरेगाव पार्क येथील हॉटेल वेस्ट इन येथे तयार होण्यासाठी व ब्रेकफास्टसाठी थांबले होते. याचदरम्यान, राष्ट्रवादीच्या तीनही उमेदवारांनी त्यांची भेट घेतली. तसेच आघाडीच्या उमेदवारांच्या तयारीबाबत माहिती दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button