breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे
‘सीरम इन्स्टिट्यूट’ आग घटना : कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील आणि सायरस पुनावाला यांच्यात चर्चा
पुणे । प्रतिनिधी
पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या आग लागलेल्या इमारतीची राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी शुक्रवारी सकाळी पाहणी केली. तसेच, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक सायरस पुनावाला यांच्यासोबत घटनेबाबत चर्चा करण्यात आली.
दरम्यान, आगीच्या घटनेमध्ये मृत्यूमूखी पडलेल्या कामागारांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीत 5 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकून अदर पुनावाला यांनी शोक व्यक्त केलेला आहे.
पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्या आग लागलेल्या इमारतीची पाहणी करून संस्थेचे संस्थापक श्री.सायरस पुनावला यांच्यासमवेत चर्चा केली. आगीत ५ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आगीत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांना भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/6O26pcbgju
— Dilip Walse Patil (@Dwalsepatil) January 22, 2021