सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेच्या विरोधात;भाजपा महिला आघाडीचे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
![Social Justice Minister Dhananjay Munde; BJP Women's Front agitation in front of Pune District Collector's Office](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/bjp-morcha.jpg)
पुणे – ‘हाय हाय सामाजिक न्याय, मंत्रीच करतात महिलांवर अन्याय, घोषणाबाज महाविकास आघाडी सरकार, मंत्रीच करतात महिलांवर अत्याचार,’ अशा घोषणा देत पुणे शहर भाजपा महिला आघाडीच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
भाजपा महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा सौ.उमा खापरे यांच्या नेत्तृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात पुणे महिला आघाडी शहराध्यक्षा सौ.अर्चना पाटील, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्यासह अन्य नगरसेविका, महिला पदाधिकारी उपस्थित होत्या
वाचा :-ग्रामपंचायत निवडणूक निकाल : पुण्यात मिरवणुका काढण्यास मनाई
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना सौ.खापरे म्हणाल्या, महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी निवडणुक लढविण्यासाठी निवडणूक आयोगाला जे प्रतिज्ञापत्र सादर केले त्यामध्ये दुसरे लग्न आणि अपत्यांची माहिती लपवून फसवणूक केली आहे. त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी.
तसेच दुसऱ्या पत्नीच्या बहिणीवर अन्याय अत्याचार करूनही नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देत नाहीत. त्यामुळे झोपी गेलेल्या राज्यसरकारला जागं करण्यासाठी आणि मुंडे यांचा राजीनामा घ्या या मागणीसाठी भाजपा महिला आघाडीच्या वतीने राज्यभरात आंदोलन करत आहोत, असे त्यांनी सांगितले.