breaking-newsताज्या घडामोडीपुणे

सांगोल्यात माळी समाजाच्या अधिवेशनात छगन भुजबळांनी केले मनुस्‍मृतीचे दहन

सांगोला ( महा ई न्यूज ) – सांगोल्यात महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे राज्यस्तरीय अधिवेशन शनिवारी पार पडले. या अधिवेशनात माजी उपमुख्यमंत्री छगन भूजबळ यांनी मनस्मृतीचे दहन केले.  या कार्यक्रमाचे अध्यक्ष छगन भूजबळ होते, याप्रसंगी माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे, निशिगंधा माळी, आमदार पी आर रमेश, कल्याण आखाडे, सिद्धाराम म्हेत्रे  उपस्‍थित होते.

महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या अधिवेशनात ओबीसी आरक्षण संरक्षण करणे, ओबीसी समाजाची जनगणना जाहिर करणे, मंडल आयोगाची अंमलबजावणी तात्काळ करणे, शेतीला उद्योगाचा दर्जा देणे, अरण तिर्थक्षेत्राचा दर्जा उंचावणे, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी तंतोतंत लागू करणे, नायगाव, कटगुण, भिडेवाडा व फुलेवाडा पुणे राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात यावे असे ठराव मंजूर करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे सर्व विश्वस्त, आमदार सिद्धाराम म्‍हेत्रे, आमदार बळीराम सिरस्कार, कर्नाटक चे आमदार पी. आर. रमेश, कल्याण आखाडे, रंजणभाऊ गिरमे, शालिग्राम मालकर, डॉ. प्रभाकर माळी, सीए के.एस. माळी, तुकाराम कुदळे, शिवाजी बनकर, मारूती बनकर, मधुकर बनसोडे, सोमनाथ राऊत, सुरेश माळी,अच्युत फुले आदींसह अनेक माळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button