सांगवीत जयंती महोत्सवाची भीमगितांच्या कार्यक्रमाने सांगता
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/04/0Sanyukt_20Jayanti.jpg)
पिंपरी- सांगवी येथील फिनिक्स सोशल ऑर्गनायझेशन व नगरसेवक संतोष कांबळे मित्र मंडळाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर ,छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले,भगवान गौतम बुद्ध यांच्या तीन दिवसीय संयुक्त जयंती महोत्सवाची सांगता प्रसिद्ध गायक जोडी आनंद शिंदे, मिलिंद शिंदे यांच्या भीमगितांच्या कार्यक्रमाने करण्यात आली.
पहिल्या दिवशी आनंद शिंदे व सहकाऱ्यांच्या भीमगीतांचा कार्यक्रम झाला. त्यांनी “सोनियाची उगवली सकाळ, माझ्या भीमराया वाणी कुणी पुढारी होईल का, शिवचरीत्रावरील स्फूर्ती गीते सादर केली. त्यांनी सादर केलेल्या त्यांच्या खास शैलीतील, आहे कोणाचे योगदान लाल दिव्याच्या गाडीला.., नव्हतं मिळत पोटाला,आता कमी नाही नोटाला या गितांना रसिकांनी भरभरून दाद दिली. दुसऱ्या दिवशीच्या संगीत कार्यक्रमात मिलिंद शिंदे यांनी बहारदार गीते सादर केली.”जिथं जिथं गाव,तिथं भिमराव, जरी झाला बँरिस्टर तरी पडला ना विसर, भीम आवडीन खाई खाई कांदा नी भाकर, चवदार तळ्यावर, आदी गीते सादर केली.
सांगवीसह परिसरातील रसिक श्रोत्यांनी कार्यक्रमास गर्दी केली होती. समारोपाप्रसंगी आ.लक्ष्मण जगताप, नगरसेवक अंबरनाथ कांबळे,सागर अंगोळकर, आदीती निकम, हर्षल ढोरे,हिरेन सोनवणे,माई ढोरे,जवाहर ढोरे, शारदा सोनवणे, शिवलिंग किनगे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष कांबळे यांनी केले तर आभार अमित बाराथे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी राहुल विधाते,रविंद्र यादव,प्रविण कांबळे,निमिष कांबळे,तृप्ती कांबळे यांनी परिश्रम घेतले.